व्हॉट्स अॅप हा आता आपल्यातील अनेकांच्या जगण्यातील महत्त्वाचा हिस्सा झाला आहे. पण आता हे अॅप्लिकेशन वापरणे म्हणावे तितके सुरक्षित राहीलेले नाही. आपल्याकडे व्हॉट्स अॅपचा डेटा जास्त झाल्यावर आपण त्याचा बॅकअप घेतो. मात्र आता बॅकअप घेतलेला व्हॉट्स अॅपचा डेटा सुरक्षित नसेल असे समोर आले आहे. गुगल ड्राईव्हवर बॅकअप घेतलेला हा डेटा गुगल वाचू शकते. तसेच कोणत्या सुरक्षा एजन्सीकडून या डेटाची मागणी करण्यात आल्यास त्यांनाही तो डेटा देण्यात येईल.
व्हॉट्स अॅप आपल्या युजर्सना ‘एंड टु एंड इन्क्रिप्शन’ ची सुविधा देते. याचा फायदा म्हणजे आपण एखादा मेसेज कोणाला पाठवल्यास तो मेसेज किंवा संबंधित फाईल केवळ त्या व्यक्तीलाच दिसते, आणि इतर कोणालाही दिसत नाही. विविध अफवा आणि पसरणाऱ्या चुकीच्या गोष्टी नेमक्या कोणाकडून व्हायरल होतात हे ओळखण्यासाठी विशिष्ट यंत्रणा असावी. यासाठी भारत सरकारकडून मागच्या काही दिवसांपासून व्हॉट्स अॅपवर दबाव टाकण्यात येत आहे. पण असे केल्यास युजरची गोपनियता नष्ट होत असल्य़ाने आम्ही अशाप्रकारची यंत्रणा बनवू शकत नाही असे कंपनीने भारत सरकारला कळवले आहे.
दरम्यान, व्हॉट्स अॅपने गुगलसोबत यासाठी युती केली असून ज्याद्वारे व्हॉट्स अॅपचे मेसेज आता गुगल ड्राईव्हमध्ये राहू शकणार आहेत. यामध्येही आपल्याला हा बॅक अप हवा आहे की नाही याबाबतचा निर्णय युजरला घेता येणार आहे. पण हा डेटा गोपनिय राहणार नसून गुगलकडे त्याचा ट्रॅक ठेवला जाणार आहे. एखाद्या सरकारी एजन्सीने गुगलकडे या डेटाची मागणी केल्यास कंपनीला तो डेटा एजन्सीला पुरविणे भाग आहे. गुन्हेगारीसारख्या गोष्टी उघडकीस येण्यास याचा निश्चितच फायदा होईल. गुगलकडून प्रत्येक युजरला १५ जीबीची स्पेस मिळते. त्यातच आता हा व्हॉटस अॅपचा बॅकअप सेव्ह होणार आहे.
अधिक वाचा : Jio Phone 2 की अगली सेल 30 अगस्त को