नागपूर : एकाच दिवसात कोरोनाचे ४४ नवे रूग्ण

विदर्भात सर्वाधिक रूग्ण असलेल्या उपराजधानी नागपुरात दिवसभरात ४४ नवे कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहे.

corona

नागपूर : विदर्भात सर्वाधिक रूग्ण असलेल्या उपराजधानी नागपुरात दिवसभरात ४४ नवे कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहे. नागपुरातील ४४ रूग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रूग्णांचा आकडा १६१ वरून वरून २०० च्या पार पोहोचला आहे. त्या तुलनेत बुधवारी आलेल्या अहवालात दैनंदिन संशयित रूग्णांची संख्या कमी होऊन ३३ वर घसरल्याने नागपूरकरांना थोडा दिलासा मिळाला होता.

नव्याने आढळलेले अधिकांश रूग्ण हे सतरंजीपुरा या परिसरातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपुरातील सतरंजीपुरा या एकाच भागातून आतापर्यंत सुमारे ११० रूग्ण कोरोनाबाधित झाल्याने या परिसरातील १४०० नागरीकांचे सक्तीने संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. तर उपचार सुरू असलेल्या पॉझीटिव्ह रूग्णांचे सलग तीन अहवाल निगेटिव्ह आल्याने आतापर्यत कोरोनामुक्त झालेल्या ६४ रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Also Read- परराज्यात जाणा-या रेल्वे प्रवाशांच्या भोजनाची मनपातर्फे व्यवस्था

शुक्रवारी दि. २४ एप्रिलला कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येने नागपुरात शंभरचा आकडा गाठला होता. त्यानंतर पुढील १२ दिवसात नागपुरात १०० हून अधिक नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. मागील संपूर्ण महिनाभर नागपुरात दर दिवशी कोरोनाबाधित रूग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शहरातील कोरोनाबाधितांचा रूग्णांची संख्या १६ एवढी होती. मात्र, आता कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २०० हून अधिक झाली आहे.

Also Read- मृताचा कोरोना अहवाल येईपर्यंत संपर्क टाळा: मनपा आयुक्त तुकाराम मुंढे