विदर्भात पावसाने दमदार पुनरागमन: गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात पूर

Date:

नागपूर: मागील दोन दिवसांपासून विदर्भात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली शहरात रस्त्यांवर पाणी साचले. नगर परिषद कार्यालयातही पाणी शिरल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. भामरागड आणि मूलचेरा तालुक्यातील दीडशे गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाळा संपण्यापूर्वीच जिल्ह्यात सरासरीपेक्षा १०९ मिलिमीटर अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसाने नद्या, नाले भरून वाहत आहेत. दक्षिण गडचिरोलीतील भामरागड आणि मूलचेरा या दोन तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला. पर्लकोटा नदीला पूर आल्याने मोठा पूल पाण्याखाली आला आहे. त्यामुळे भामरागड तालुक्याचा दोन दिवसांपासून संपर्क तुटला आहे. पर्लकोटा नदीचे पाणी बुधवारी भामरागड गावात शिरल्याने नागरिकांना परत एकदा पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. तहसीलदार कैलास अंडील यांच्या नेतृत्वात तालुका प्रशासनाने शंभरहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. हेमलकसा-आलापल्लीदरम्यान बांडिया नदीसह तुमरगुडा नाल्यालाही पूर आल्याने या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली होती. यंदाच्या पावसाळ्यात भामरागडचा संपर्क तुटण्याची ही पाचवी वेळ आहे. दिना नदीच्या पुलावरून चार फूट पाणी वाहत असल्याने मूलचेरा तालुक्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. अहेरी तालुक्यात जिमलगट्टा परिसरातील २५ गावांचा किष्टापूर नाल्याला पूर आल्याने संपर्क तुटला आहे. चामोर्शी तालुक्यातही याहून वेगळी परिस्थिती नाही.
गडचिरोली शहरात बुधवारी सकाळपासून दुपारी दीड वाजतापर्यंत संततधार पाऊस झाला. पावसाचा जोर अधिक असल्याने रस्ते जलमय झाले. शहरातील चामोर्शी मार्गासह आयटीआय चौक आणि इतर रस्त्यांवरही पाणी साचले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प पडली होती. गडचिरोली नगर परिषद कार्यालयातही पाणी शिरले. नगराध्यक्षांच्या कक्षासह अन्य विभागांच्या कार्यालयातही पाणी शिरल्याने सामान प्रवाहित झाले. सर्वसाधारण सभाही पावसामुळे पुढे ढकलण्यात आली. नगर परिषद परिसरातील गाड्याही बुडाल्या होत्या. गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील केमिस्ट भवनाजवळ पाणी साचल्याने तब्बल दोन तास वाहतुकीस मज्जाव करण्यात आला होता.

 

इरईचे पाच दरवाजे उघडले

चंद्रपूर : मुसळधार पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. इरई धरणाचे बुधवारी या मोसमात सहाव्यांदा पाच दरवाजे उघडण्यात आले. इरई धरणाची पाणी पातळी २०७.३७५ मीटरपर्यंत पोहचली आहे. चारगाव, चंदई, लभानसराड, असोलामेंढा, नलेश्वर या धरणांत १०० टक्के पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी जितेश सुरवाडे यांनी दिली.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

International Dance Day 2024 : Date History Significance Wishes & Quotes..

April 29th of every year is known as World...

Complex Thumb Re-plantation Surgery at Krims Hospital – A Remarkable Medical Achievement

Nagpur: A remarkable medical feat unfolded at KRIMS Hospital...

10 Best Cafe Restaurants in Nagpur 2024

Nagpur, a city in Maharashtra, is well-known. It's not...