हॉस्पिटलमध्ये युवकाची आत्महत्या

Suicide in nagpur, नागपूर

नागपूर : छाप्रूनगर चौकातील सारडा हॉस्पिटलमध्ये ३२ वर्षीय रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राहुल ईश्वरदास सतई (वय ३२, रा. कारंजा घाडगे, जि. वर्धा) असे मृताचे नाव आहे. राहुल याने पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. तो मनोरुग्ण होता, असे कळते. रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच लकडगंज पोलिस घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. अन्य एका घटनेत वैशालीनगर भागात घरासमोरच ५० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. ही घटना सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मुकेश नरसिंग हातीपंचोल असे मृताचे नाव आहे.

अधिक वाचा : ‘सीईटी’साठी कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाहीच : SC