जागतिक मराठी साहित्य संमेलन नागपुरात

Date:

नागपूर : जागतिक मराठी अकादमीच्यावतीने २००४ साली पहिले जागतिक मराठी साहित्य संमेलन – ‘शोध मराठी मनाचा’ नागपुरात घेतले होते. त्याला आता तब्बल १४ वर्षे झाली असून परत एकदा हे जागतिक स्तरावरचे संमेलन घेण्याचा मान वेगाने स्मार्ट सिटी व मेट्रो सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नागपूर शहराला मिळालेला आहे. येत्या ४, ५ व ६ जानेवारी २०१९ मध्ये हे संमेलन नागपुरात होणार आहे.

देशाच्या मध्यभागी असलेले नागपूर शहर वेगाने विकसित होत आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून सांस्कृतिक क्षेत्रातही शहर झपाट्याने पुढे येत असून, खासदार सांस्कृतिक महोत्सव, डॉ. वसंतराव देशपांडे संगीत समारोह, कालिदास संगीत महोत्सव अशा अनेक कार्यक्रमांचे दर्जेदार आयोजन होताना दिसते आहे. या कार्यक्रमात जागतिक दर्जाच्या कलाकारांनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. स्मार्ट सिटी, मेट्रो सिटीच्या दिशेने झेपावलेल्या शहराला परत एकदा जागतिक मराठी संमेलनाच्या आयोजनाचा सन्मान मिळालेला आहे. जागतिक मराठी अकादमीद्वारे आतापर्यंत ९ साहित्य संमेलने घेण्यात आलेली आहेत. पहिले संमेलन नागपुरात २००४ साली घेण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष वक्तादशसहस्त्रेषू राम शेवाळकर होते. त्यानंतर अहमदनगर, मुंबई, पुणे, पणजी, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, विरार (ठाणे) येथे झाले होते. दहावे संमेलन २०१३ साली नाशिक येथे झाले होते आणि या संमलेनाचे अध्यक्ष चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते आशुतोष गोवारीकर हे होते. जागतिक मराठी अकादमीची ही संमेलने भारतातच भरवली जातात. पण, त्यात सहभागी होणार प्रतिनिधी आणि साहित्यप्रेमी हे परदेशातूनही येतात. त्यामुळेच या संमेलनाचा जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे. सारक मंडळी, मराठवाडा लोक विकास मंच (मुंबई)आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.

नागपुरात जानेवारी २०१९ मध्ये होणारे हे ११ वे राहणार असून त्याचे समन्वयक शशिकांत चौधरी असून संयोजक गिरीश गांधी आहेत. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार विजय दर्डा, उद्योजक सत्यनारायण नुवाल, माजी खासदार अजय संचेती व पी. डी. पाटील हे या संमेलनाचे मार्गदर्शक राहणार आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे साहित्य संमेलन यंदा विदर्भाच्या वाट्याला आले असून ११ ते १३ जानेवारीदरम्यान यवतमाळ येथे होत आहे. त्याआधीच हे जागतिकस्तरावरचे साहित्य संमेलनदेखील विदर्भाच्या वाट्याला आले असल्यामुळे साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

अधिक वाचा : झिरो माइल नागपूर मॅराथॉन १८ नोव्हेंबरला

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Top 10 Email Migration Software for Gmail in 2024

Email migration can be a daunting task, especially when...

Top Best Bulk SMS Service Providers in India

Below is the list of companies currently providing top...

Top Digital Marketing Innovators to Watch in 2025

As an online business in the digital world, where...

ICSI Workshop in Nagpur : “Decoding Companies Act” for Compliance and Governance

Nagpur : Nagpur Chapter of ICSI organized a Workshop...