World Cup 2019 : विराट-विल्यमसन पुन्हा आमनेसामने

नागपूर : वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीच्या लढती आता स्पष्ट झाल्या असून पहिली उपांत्य फेरीची लढत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि केन विल्यमसनच्या कप्तानपदाखालील किवी संघ आमनेसामने येणार असले तरी या दोघांच्या कर्णधारपदाखाली हे दोन्ही संघ प्रथमच एकमेकांसमोर येत नाहीत. २००८ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या वर्ल्डकपमध्येही विराट आणि विल्यमसन यांचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तीदेखील उपांत्य लढतच होती. त्या लढतीत भारताने न्यूझीलंडला नमविले होते.

त्या सामन्यात विराटने ४३ धावांची खेळी केली होती तसेच २७ धावा देत २ बळीही घेतले होते. त्या सामन्यात विराट सामनावीर ठरला होता. ही उपांत्य लढत जिंकल्यानंतर भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजेतेपद पटकाविले होते.

केवळ विराट आणि केन विल्यमसनच नव्हे तर त्या संघात भारताचे प्रतिनिधित्व करणारा रवींद्र जाडेजा आणि किवी संघातील ट्रेन्ट बोल्ट व टिम साऊदी हेदेखील आताच्या संघात आहेत. आताच्या वर्ल्डकपमधील उपांत्य लढतीत भारत त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करतो का ते पाहायचे.

अधिक वाचा : Nagpur – Only 51% members’ nod must for redevelopment of co-op housing societies