विधवेचे अश्लील छायाचित्र व्हायरल, आरोपी फेसबुक फ्रेण्डला अटक

Date:

नागपूर : फेसबुक फ्रेण्डने ४०वर्षीय विधवेचे अश्लील छायाचित्र व्हायरल केल्याची खळबळजनक घटना गिट्टीखदान भागात उघडकीस आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग व आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

अक्षय ऊर्फ रणविजय शेखर गणवीर (वय २७, रा. कॉसमॉस सोसायटी, सोमलवाडा) असे अटकेतील युवकाचे नाव आहे. तो खासगी कंपनीत काम करतो. या महिलेच्या पतीचे निधन झाले. ती खासगी काम करीत असून, दोन अपत्यांसह गिट्टीखदान भागात राहाते.

जानेवारी २०१८मध्ये तिची अक्षयसोबत फेसबुकद्वारे ओळख झाली. फेसबुक चॅटिंगदरम्यान अक्षय व तिच्यात सूत जुळले. त्याने तिला स्वत:चे अश्लील छायाचित्र पाठवायला भाग पाडले. काही दिवसांपूर्वी त्याने तिला लग्नाची मागणी घातली. महिलेने नकार दिला. त्याने महिलेचे अश्लील छायाचित्र व्हॉट्सअॅपद्वारे तिच्या मुलाला पाठविले. लग्न न केल्यास मुलांना ठार मारण्याची धमकीही दिली. महिलेने गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक योगेश खडसान यांनी विनयभंग व आयटी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करून अक्षयला अटक केली.

अधिक वाचा : रनाळा येथे देह व्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड : आरोपी अटकेत

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related