इंजिनाची ६ चाके रूळावरून घसरली,बॅटरी बॉक्सला इंजिन धडकले….

Date:

नागपूर : मुंबईहून आलेले सेवाग्रामचे डबे यार्डात घेऊन जाताना इंजिनाची ६ चाके रूळावरून घसरली. ही घटना नागपूर- अजनी दरम्यान यार्डात घडली. रेल्वे रूळाशेजारी असलेल्या बॅटरी बॉक्सला इंजिन धडकले तर ‘ओएच’ खांब तुटले. स्थानिक गाड्यांची देखभाल आणि दुरूस्ती यार्डात केली जाते. नेहमीप्रमाणे मुंबईहून आलेल्या सेवाग्राम एक्स्प्रेसचे डबे सायंकाळच्या सुमारास अजनी यार्डात घेऊन नेले जात होते.

सायंकाळी ६.३० ते ७ वाजताच्या सुमारास नागपूर – अजनी यार्डादरम्यान हॉटेल हरदेवजवळील पुलावर अचानक इंजिनाची ६ चाके रूळाखाली आली. विशेष म्हणजे इंजिनाचा बहुतांश भाग रुळ सोडून बाहेर पडला. या घटनेमुळे रेल्वे रुळाशेजारील इंजिनाला वीज पुरवठा करणारे ‘ओएचईङ्क खांब तुटले. या शिवाय बॅटरी बॉक्सलाही धडक बसली. वीज पुरवठा करणारी यंत्रणाच विस्कळीत झाल्याने याचा प्रभाव मुख्य मार्गावरही झाला. यावेळी विदर्भ एक्स्प्रेसला थोडा उशिर झाला. ओएचई खांबाच्या दुरूस्तीसाठी वीज पुरवठा खंडित करावा लागला. जवळपास दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर ओएचई खांबांची दुरूस्ती करण्यात कर्मचाèयांना यश मिळाले.

माहिती मिळताच मदत वाहन आणि कर्मचाèयांनी घटनास्थळी धाव घेतली. ओएचई खांबाची दुरूस्ती झाल्यानंतर इंजिनाला रूळावर घेण्यासाठी बराच वेळ लागणार होता. मात्र, अनुभवी कर्मचाèयांनी कौशल्य दाखविल्याने अवघ्या पाच मिनिटात इंजिन रूळावर घेता आले. वरिष्ठ अभियंता अखिलेश चौबे यांच्या मार्गदर्शनात हे काम सुरळीत करण्यात आले.

पुरस्काराने सन्मानित
इंजिनाची चाके रुळाखाली आल्यानंतर इंजिनाला पुन्हा रूळावर घेण्यासाठी बराच वेळ लागतो. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आणि वेगवेगळ्या यंत्रांची गरज भासते. मात्र, एआरटी कर्मचारी गणेश रामदीप यांनी अनुभव आणि कौशल्य दाखविले. रूळाजवळ पडलेल्या लोखंडी तुकड्यांना ठिकठिकाणी जोडून ठेवले (खेळण्यांप्रमाणे) त्यावर चाके येताच क्षणात इंजिनाला रेल्वे रूळावर ओढले. या कौशल्यामुळे त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...