राहुल गांधींच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकरने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

Date:

नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतील लोकसभा निवडणुक लढवणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र, उर्मिला मातो़ंडकरनं अद्याप या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. अशात आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत उर्मिलाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

उर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी तिला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, उत्तर मुंबईतून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात ती निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत.

अधिक वाचा: PM Modi to launch poll campaign from Wardha

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related