नागपूर : पेट्रोल-डिझेल दर भडकले ; महागाईचा मार

Date:

नागपूर : मुंबई- केंद्रातील मोदी सरकारनं काल, शुक्रवारी अर्थसंकल्प मांडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मार बसला आहे. मुंबई, दिल्लीसह अन्य महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल दर लिटरमागे २.४० रुपयांनी वाढून ७८.५७ रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलच्या दरातही लिटरमागे २.५० रुपयांची वाढ होऊन ६९.९० रुपयांना मिळत आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवरील अबकारी शुल्क, रस्ते अधिभारात लिटरमागे प्रत्येकी एक रुपयाची वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परिणामी पेट्रोल, डिझेलच्या दरांत आजपासून वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर काल ७६.१५ रुपये प्रतिलिटर होते, आज त्यात २.४२ रुपयांची वाढ होऊन ७८.५७ रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलच्या दरात २.५० रुपयांची वाढ होऊन ते ६९.९० रुपयांवर पोहोचले आहे.

>> दिल्ली:
पेट्रोल (प्रतिलिटर)- ७२.९६ रुपये ( २.४५ रु. वाढ)
डिझेल – ६६.६९ रुपये (२.३६ रु. वाढ)

>>कोलकाता:
पेट्रोल (प्रतिलिटर)- ७५.१५ रुपये ( २.४० रु. वाढ)
डिझेल – ६८.५९ रुपये (२.३६ रु. वाढ)

>> चेन्नई:
पेट्रोल (प्रतिलिटर)- ७५.१५ रुपये ( २.५७ रु. वाढ)
डिझेल – ७०.४८ रुपये (२.५२ रु. वाढ)

अधिक वाचा : दिशा महाजन बनीं मिस नागपुर

 

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

List of Best Technology Companies In Washington

IT Services are the operations that ensure the machine...

Annie Wersching, ‘24’ actress, passes away at 45

Actor Annie Wersching, best known for her role as...

Sony India unveils the premium Walkman® model NW-ZX707 with enhanced sound quality and longer battery life

New Delhi, 30th January 2023: Sony India today announced...

NEW MAHINDRA ELECTRIC , XUV400 UNVEILED AT PROVINCIAL AUTOMOBILE

New Mahindra electric XUV 400 was formally unveiled at...