काश्मीर : कुलगाममध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

Date:

नागपूर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दल आणि अतिरेक्यांदरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या ठिकाणी अजूनही अतिरेकी लपलेले असण्याची शक्यता असल्याने या परिसरात चकमक सुरूच आहे.

कुलगाम येथील गोपालपोरामध्ये रात्री उशिरापासून चकमक सुरू असून दहशतवाद्यांना सुरक्षा दलाकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असून सुरक्षा दलाने आतापर्यंत दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातलं आहे. या परिसरात आणखीही काही अतिरेकी लपल्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाने या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दला दरम्यान जोरदार चकमक झाली होती. त्यात तीन अतिरेकी मारले गेले होते. त्यात शौकत अहमद डाल या अतिरेक्याचाही खात्मा करण्यात आला होता.

अधिक वाचा : नागपुरात जावयाचा मृत्यू, मेहुण्याविरुद्ध गुन्हा

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related