नागपूर : महात्मा गांधी यांनी जीवन शैली व त्यागातून दिलेला सर्व धर्म समभावाचा संदेश व विचारांची सद्यस्थितीत देशाला गरज आहे. त्यांचे विचार आचारणात आणावे आणि त्यास अनुसरून देश सेवा करावी, असे आवाहन लिलाताई चितळे यांनी केले.
शहर काँग्रेस समिती व जागतिक अहिंसा दिवस आयोजन समितीच्यावतीने महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त व्हरायटी चौकात प्रार्थना सभा आयोजित करून आदरांजली अर्पण करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी कुलगुरू हरीभाऊ केदार, काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, माजी आमदार यादवराव देवगडे, प्रवक्ते विशाल मुत्तेमवार, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, शेख हुसेन, रामगोविंद खोब्रागडे, बंडोपंत टेंभुर्णे, संजय महाकाळकर, दिनेश बानाबाकोडे, अभिजित वंजारी, महिला अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक प्रामुख्याने उपस्थित होते. जागतिक अहिंसा दिवस आयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर धर्माधिकारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार यांनी संचालन केले. कार्यक्रमास सुजाता कोंबाडे, देवा उसरे, योगेश तिवारी, विवेक निकोसे, डॉ. रिचा जैन, संजय सरायकर प्रसन्ना जिचकार, राजकुमार कमनानी, राजेश पौनिकर, आशिष नाईक, आकाश तायवाडे, अशोकसिंह चव्हाण, मिलिंद सोनटक्के आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
अधिक वाचा : नागपूर शहरातील प्रकल्पांना गती द्या : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निर्देश