नागपुरात रेल्वेचे फिरते एटीएम

Nagpur Junction
Nagpur Junction

नागपुर: प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने फिरत्या एटीएमची सोय पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने केली आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेत अशा प्रकारची सुविधा पहिल्यांदा नागपुरात सुरू झाली आहे.

प्रवाशी आणि कर्मचारी दोघांचीही सोय यामुळे झाली आहे. नागपूर रेल्वे स्थानकापुढे (पश्चिम द्वार) तसेच पूर्व द्वार, अजनी रेल्वे कार्यशाळा, अजनी रेल्वे कॉलनी, डीआरएम कार्याल येथे विशिष्ट वेळात हे फिरते एटीएम असणार आहे. त्यासाठी हे एटीएम एका गाडीवर ठेवण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांची तर सोय झाली आहेच, शिवाय रेल्वेलाही यातून महसूल मिळणार आहे. कारण एटीएम असलेली गाडी ज्या ठिकाणी उभी राहील त्याचे भाडे रेल्वेच्या तिजोरीत जमा होणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नताही भर पडणार आहे. अलीकडेच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी याबाबतचे परवानगी पत्र पंजाब नॅशनल बँकेचे उपमहाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांना दिले.

अधिक वाचा: अवस्थी नगर ते पागलखाना चौकादरम्यानची वाहतूक प्रतिबंधित ; सीमेंट रोड बांधकामामुळे ५ नोव्हेंबरपर्यंत वाहतुक बंद