नागपूर,
करोना काळात निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कुठल्याही नवीन उपाययोजनांचा अंतर्भाव तसेच सध्या सुरू असलेल्या आणि आगामी काळात होणार्या आभासी परीक्षांसाठी लागणार्या सोयीसुविधांसाठी तरतुद नसलेला अर्थसंकल्प विद्यापीठ विधीसभेच्या विशेष बैठकीत मंजूर करण्यात आला.
यात मूळ अर्थसंकल्प 421 कोटी 55 लाख 47 हजारांचा असून त्यात 55 कोटींची तूट येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश भोयर यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात 336 कोटी 53 लाख 67 हजाराचे एकूण उत्पन्न दर्शवण्यात आले या बैठकीत विधिसभा सदस्य अॅड. मनमोहन वाजपेयी, सदस्य विष्णू चांगदे, संजय कविश्वर, प्रकाश रणदिवे यांनी चर्चेत भाग घेतला. तसेच विद्यापीठाकडून तूट भरून काढताना विद्यार्थी शुल्कात वाढ नको, अशा सूचना दिल्या. सोबतच अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही नवीन योजना, नवीन सुधारणांची तरतूद नसल्याने सदस्यांनी खंत व्यक्त केली. यात शैक्षणिक विभाग, वसतिगृहे, ग‘ंथालये व स्वच्छतागृहे आदी इमारतीच्या दुरुस्ती व देखभालीसाठी 7 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कंत्राटी शिक्षकांच्या वेतनासाठी 3 कोटींची तर तासिका शिक्षकांच्या वेतनासाठी 6 कोटी, विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी 1 कोटी तर विद्यार्थी कल्याण योजनांसाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यापीठात प्रथमच नवीन क‘ीडा संकुल तयार करण्यात येणार असून यासाठी 8 कोटींचा खर्च अपेक्षित असणार आहे. यासोबतच नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रलंबित कामांसाठी 5 कोटींची तरतूद केली आहे. पुढीलवर्षी ‘नॅक’ चमू विद्यापीठाला भेट देणार आहे, यासाठी अंदाजपत्रकात 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. करोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा आणि एकूणच शैक्षणिक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे पालकांच्या मनात विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता दूर करणाजया काही विद्यार्थीकेंद्रित तरतुदींची अपेक्षा होती. मात्र, विद्यापीठाने पारंपरिक अर्थसंकल्प सादर करून केवळ औपचारिकताच पूर्ण केल्याचे दिसून येत आहे.