त्रिपुराच्या राज्यपालांनी केली ‘ही’ चूक वाजपेयींना ट्विटरवर दिली श्रद्धांजली

Date:

दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशात प्रार्थना सुरू आहेत. तर, दुसरीकडे त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी वाजपेयींना ट्विटरवर श्रद्धांजली वाहली असल्याचा प्रकार समोर आला. चूक लक्षात आल्यानंतर ट्विट डिलीट करण्यात आले.

भारताचे माजी पंतप्रधान, उत्कृष्ट वक्ता आणि सहा दशके देशाच्या राजकारणावर छाप सोडणारे, विनम्र अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले असे आशयाचे ट्विट त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केले.

या ट्विटनंतर तथागत रॉय यांना ट्रोल करण्यात आले. अखेर त्यांनी दिलगिरी व्यक्त करणारे ट्विट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related