भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अनुसार, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने मान्यता दिलेली 820 केंद्रीय संरक्षित स्मारके जेथे पूजाविधी, उपासनेची स्थाने असतील, ते उद्या 8 जून 2020 पासून खुली होतील, असे केंद्रिय संस्कृती आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी जाहीर केले. श्री पटेल असेही म्हणाले, गृह व्यवहार मंत्रालयाने आणि आरोग्य मंत्रालयाने घालून दिलेल्या सर्व शिष्टाचारांचे या स्मारकांमध्ये पालन केले जाईल.
आज संस्कृति मंत्रालय ने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग के संरक्षित ८२० सक्रिय गतिविधियों वाले स्मारकों को ८जून से खोलने की स्वीकृति दी है।गृह एवं स्वास्थ्य मंत्रालय के नि्र्देशो का पालन हो यही अपेक्षा है @PMOIndia @BJP4MP @incredibleindia @MinOfCultureGoI @BJP4India @ — Prahlad Singh Patel (@prahladspatel) June 7, 2020
या आदेशामध्ये, सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 4-06-2020 रोजी जारी केलेल्या धार्मिक स्थळांमधील उपासना, प्रार्थनास्थळाच्या बाबत कोविड – 19 प्रतिबंधात्मक मानक कार्यप्रणालीमध्ये (एसओपी) दिलेले सर्व प्रतिबंधात्मक उपायांची सुनिश्चितता एएसआय करेल आणि ही केंद्रिय संरक्षित स्मारके उघडताना आणि व्यवस्थापित करताना त्याचे काटेकोरपणे अनुसरण केले जाईल. भारत सरकारचे गृहमंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, हे सरकारने जारी केलेल्या इतर सर्व निर्देशांचे पालन केले जाईल याचीही एएसआय खात्री करेल.
सांस्कृतिक मंत्रालयाने एएसआयला विनंती केली आहे की, 8-06-2020 रोजी खुली करण्यात येणाऱ्या संबंधित 820 केंद्रिय संरक्षित स्मारकांची यादी संबंधित राज्यांना आणि जिल्ह्यांना नोंद घेण्यासाठी देण्यात यावी आणि कोविड – 19 च्या नियंत्रणास प्रतिबंध आणि प्रतिबंधासंदर्भात कोणतीही राज्य किंवा जिल्हा विशिष्ट आदेशांची सर्वसमावेशक अंमलबजावणी होते, हे पहावे.