नागपूर : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीसीएसने आपली व्यवसाय विस्तार योजना जारी केली असून या योजनेची माहिती देण्यासाठी शुक्रवारी टीसीएसचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख हर्षल गजघाटे आणि रेवती मुलमुले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली.
टीसीएसच्या या विस्तार योजनेमुळे आगामी काळात हजारो सुशिक्षित युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. सध्या मिहान प्रकल्पात टीसीएस या कंपनीने ५० एकर जागेवर आपला प्लांट प्रारंभ केला. आता आणखी ५० एकर जागा कंपनीने खरेदी केली असून एकूण १०३ जागेवर या कंपनीने काम सुरू असून नव्या विस्तार योजनेसाठी कंपनी प्रबंधनाने मोठी गुंतवणूक केली असल्याची माहिती गजघाटे यांनी नितीन गडकरी यांना दिली.
याप्रसंगी कंपनीच्या अधिकाèयांशी चर्चा करताना नितीन गडकरी यांनी, नागपुरात नियुक्त्या करताना शक्यतोवर स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा, नागपूरसह विदर्भात मोठ्या संख्येत सुशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे. आयटी आणि नॉन आयटी क्षेत्रात तसेच मॅनेजमेंटच्या क्षेत्रात नागपूरसह विदर्भातील युवकांना संधी द्यावी असे आवाहनही गडकरी यांनी केले.
टीसीएसची ही विस्तार योजना आगामी तीन वर्षात पूर्ण होणार असून त्यात विदर्भातील युवकांना रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी टीसीएसच्या अधिकाèयांनी नितीन गडकरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.