नागपूर : प्रवाशांची प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने गांधीधाम-खुर्दा रोड-गांधीधाम दरम्यान सुपरफास्ट साप्ताहिक रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या चालविण्याची घोषणा केली आहे.
रेल्वे प्रशासनाने केलेल्या घोषणेनुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२९७३ गांधीधाम-खुर्दा रोड ही गाडी गांधीधाम येथून १६ सप्टेबरला बुधवारी रात्री ११ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी गुरुवारी वीरमगम येथे २.३४ वाजता, अहमदाबादला पहाटे ४ वाजता, आनंद येथे ५.३४ वाजता, वडोदराला ६.१७ वाजता. जळगावला दुपारी २.०५ वाजता, भुसावळ २.४० वाजता, वर्धा ८.०४ वाजता, नागपूरला रात्री ९.५० वाजता आणि खुर्दा रोडला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२९७४ खुर्दा रोड-गांधीधाम ही विशेष रेल्वेगाडी खुर्दा रोडवरून १९ सप्टेबरला शनिवारी सकाळी ११.४० वाजता सुटेल.
ही गाडी दुर्गला दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता, गोंदियाला सकाळी ६ वाजता, नागपूरला रविवारी सकाळी ८.२० वाजता, वर्धा ९.३० वाजता, भुसावळला दुपारी २.२० वाजता, बडोदराला रात्री ११.२० वाजता आणि तिसऱ्या दिवशी गांधीधामला सकाळी ६.४० वाजता पोहोचेल. या गाडीला एकूण २३ कोच असून त्यात १० स्लिपर क्लास, १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ६ साधारण आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे.