नागपूर / इटलीवरून आलेल्यांना भारताचे नागरिकत्व मिळते, सुधीर मुनगंटीवार यांची काँग्रेसवर टीका

सुधीर मुनगंटीवार

नागपूर – नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून देशभरात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा पाठिंबा असल्याचे सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे. दरम्यान इटलीवरून आलेल्यांना नागरिकत्व मिळते, मात्र बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानातून आलेल्या बिगर मुस्लिम नागरिकांना नागरिकत्व देणे यांना अडचण वाटते अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

…तर राजीनामा देणारा मी पहिला नेता असेन

बाहेरून येणाऱ्या शरणार्थिंना भारतीय नागिरकत्व दिल्याने देशातील कुणाच्याही नागरिकत्वाला धोका पोहोचणार नाही. असे झाल्यास राजीनामा देणारा मी पहिली नेता असेन असे मुनगंटीवार म्हणाले. नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेस लोकांमध्ये अफवा पसरवत असल्याची टीकाही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

आंदोलनाला हिंसक वळण

नागिरकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. दरम्यान लोकांनी शांत राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुर आणि लाठीचार्ज करावा लागत आहे.