शहरात फॅन्सी नंबर प्लेटला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांची कडक कारवाई

नागपुर शहर

नागपूर :- नागपुर शहर पोलिसांकडून अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी शहरात नवी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहीमेअतर्गंत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. यादरम्यान, जास्तीत जास्त फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहन चालकांना लक्ष्य करण्यात आले आहे. माहिती नुसार मागील २ दिवसांत ४५ वाहन चालकांवर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

आपल्या माहिती नुसार नंबर प्लेट वर अंकाचा वापर करुन दादा, मामा, भाऊ लिहणे पोलिसांकडून अवैध ठरवण्यात आले आहे. तरी सुद्धा काही वाहन चालकांकडून अशा नंबर प्लेट वापरल्या जातात. अवैध नंबर प्लेट वाहन चालकांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय वाहनाला नंबर प्लेट नसणे किंवा नंबर प्लेट न दिसणाऱ्या वाहन चालकांविरोधात देखील या मोहिमेत कारवाई करण्यात येत आहे. शहर पोलिसांनी यादरम्यान पोलिसांकडून वाहन चालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक वाचा : शहरात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ सोहळा गडकरी यांच्या हस्ते