मुलांची Immunity चांगली, राज्यानं विशेष रणनीती आखून शाळा सुरु कराव्यात; AIIMSच्या संचालकांचा सल्ला

Delhi Schools Reopening

नवी दिल्ली: देशातील कोरोना व्हायरसचं (Corona Virus) संकट अद्याप गेलेलं नाही. कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा जरी दिवसेंदिवस कमी होत असला तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Covid-19 Pandemic) धोका वर्तवला आहे. त्यातच तिसऱ्या लाटेचा (Third Wave) लहान मुलांवर जास्त प्रार्दुभाव होणार असल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. याच कारणानं देशात अनलॉक (Unlock) प्रक्रियेनंतरही देशातील बऱ्याच शाळा अद्याप उघडण्यात आलेल्या नाही. अशातच एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया ( AIIMS Director Dr Randeep Guleria) यांनी शाळा सुरु करण्याचा सल्ला दिला आहे.

तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असतानाही डॉ. रणदीप गुलेरिया यांनी पुन्हा शाळा सुरु करण्याचा सल्ला देत त्यासाठी विशेष रणनीती तयार करण्याचीही सूचना केली आहे.

गेल्या वर्षीपासून शाळा बंद

सर्व राज्य सरकारने विशेष रणनीती (Reopen Schools) आखून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार केला पाहिजे, असंही डॉ. गुलेरिया म्हणाले आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिलं लॉकडाऊन लागू केल्यापासून देशातील बर्‍याच राज्यात शाळा बंद आहेत आणि आता त्या राज्यांना शाळा पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.

कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिकवणी सुरु आहे. विद्यार्थी घरी बसून अभ्यास करत आहेत. हळूहळू ऑनलाईनची प्रक्रिया सुरु केल्यानंतर केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्यात शाळा उघडण्यास परवानगीही दिली होती. मात्र बर्‍याच राज्यात संसर्ग झाल्यानंतर, हा निर्णय मागे घेण्यात आला आणि शाळा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा बंद पडल्या.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, डॉ गुलेरिया यांनी म्हटलं की, मी शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी समर्थन देत आहे. मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे फार कमी आहेत तेथे शाळा सुरु करण्यासाठी विचार केला पाहिजे. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे तेथे शाळा पुन्हा सुरू करता येतील.

मुलांमध्ये होणाऱ्या संसर्ग दराविषयी माहिती देताना एम्सचे संचालक म्हणाले की, देशात अशी फारच कमी मुलं आहेत ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. बहुतेक मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती खूप चांगली आहे. बर्‍याच मुलांमध्ये व्हायरसशी लढण्यासाठी नैसर्गिक प्रतिकारशक्ती देखील तयार झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.