नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे दिनांक २७ ऑक्टोबर २०१८ रोजी महाराष्ट्र महापौर परिषद चे आयोजन करण्यात आलेले आहे. यापूर्वी २०१४ मध्ये अ.भा. महापौर परिषदेचे यजमान पद नागपूरला भेटले होते. परंतु महाराष्ट्र महापौर परिषदेचे यजमान पदाचा मान नागपूरला प्रथम च मिळत आहे, हि नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
सध्या महापौर परिषदेचे अध्यक्ष बृहन्मुंबई महानगर पालिकेचे महापौर प्राचार्य विश्वनाथ महाडेश्वर हे असून उपाध्यक्ष पदाचा मान नागपूर नगरीच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार यांना मिळाला आहे, हि सुद्धा नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
महापौर परिषदेचा उदघाटन सोहळा सकाळी १०:०० वाजता वसंतराव नाईक कृषी अनुसंधान केंद्र (वनामती) येथील ऑडिटोरियम मध्ये होणार असून परिषदेचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री . देवेंद्र फडणवीस जी यांच्या शुभ हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान केंद्रीय मंत्री माननीय श्री. नितीन गडकरी हे भूषवणार असून राज्याचे पालक मंत्री माननीय श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. परुषदेचा मुख्य कार्यक्रम वनामती येथील सभाकक्षात होणार आहे.
या उदघाटन सोहळ्याला सर्व निमंत्रितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर नगरीच्या महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.
महाराष्ट्र महापौर परिषद
अनु. क्र. | महापौरांचे नाव | महानगरपालिकेचे नाव |
१ | मा. श्री. विश्वनाथ महाडेश्वर | बृहन्मुंबई |
२ | मा. श्रीमती. कविता किशोर चौतमोल | पनवेल |
३ | मा. श्रीमती. डिंपल विनोद मेहता | मीरा भाईंदर |
४ | मा. श्रीमती. संगीत विठ्ठलराव खोत | सांगली मिरज कुपवाड |
५ | मा. श्रीमती. अंजली शंकर घोटेकर | चंद्रपूर |
६ | मा. श्रीमती. पंचम कलानी | उल्हासनगर |
७ | मा. श्री. संजय नरवणे | अमरावती |
८ | मा. श्री. सुरेश पवार | लातूर |
९ | मा. श्रीमती. शोभा बनशेट्टी | सोलापूर |
१० | मा. श्री. राहुल जाधव | पिंपरी |
११ | मा. श्री. शेख रशीद शेख शफी | मालेगाव |
१२ | मा. श्री. जावेद गुलाम मोहम्मद दळवी | भिवनदी निजामपूर |
१३ | मा. श्रीमती. रंजना पोपटराव मानसी | नाशिक |
१४ | मा. श्री. जयवन्त सुतार | नवी मुंबई |
१५ | मा. श्रीमती. मीना वरपुडकर | परभणी |
१६ | मा. श्रीमती. शिळा भवरे | नांदेड |
१७ | मा. श्रीमती. सीमा भोळे | जळगाव |
१८ | मा. श्रीमती. विनिता राणे | कल्याण |
१९ | मा. श्रीमती. शोभा बोंदे | कोल्हापूर |
२० | मा. श्री. रुपेश जाधव | वसई विरार |
२१ | मा. श्रीमती. मीनाक्षी शिंदे | ठाणे |
२२ | मा. श्रीमती. मुक्त टिळक | पुणे |
२३ | मा. श्री. नंदकुमार घोडले | औरंगाबाद |
२४ | मा. श्री. विजय अग्रवाल | अकोला |
२५ | मा. श्रीमती. सुरेखा कदम | अहमदनगर |