नागपूर : फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल, मंगळवार दि. २८ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येईल.
मंडळाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे –
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
एसएमएसद्वारे असा मिळवा निकाल
Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे ५७७६६ या क्रमांकावर MHHSC या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवून निकाल मिळवता येईल.
निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत. गुणपडताळणी २९ मे ते ७ जून या कालावधीत करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जून पर्यंत अर्ज करता येईल. पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणेच जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे.
अधिक वाचा : नागपूरः चकमकीत नक्षलवाद्यांचे शिबिर उद्ध्वस्त