एयर इंडियाचे सर्व्हर बंद, विमानसेवा विस्कळीत

Date:

नागपूर : एअर इंडियाचे ‘सीता’ सर्व्हर बंद पडल्याचा परिणाम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर झाला आहे. पहाटे तीन-साडेतीन पासून अनेक विमानांच्या वेळा बदलण्यात आल्या असून देश-विदेशातील विमानतळांवर प्रवासी खोळांबले आहेत.

प्रत्येक विमान कंपनीचे एक सीता सर्व्हर असते. या सीता सर्व्हरने विमानसेवेच्या वेळापत्रकावर नियंत्रण ठेवण्यात येते. पण हे सीता सर्व्हरच बंद पडल्यामुळे एअर इंडियाची विमानसेवा आज सकाळी विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. दिल्ली विमानतळावर अनेक प्रवासी विमानांच्या प्रतिक्षेत खोळांबले आहेत. अनेक प्रवाशांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.

आता, सीता सर्व्हर सुरळीत :

एअर इंडियाचे सीता सर्व्हर आता सुरळीत झाले असल्याची माहिती आली आहे. आज सकाळपासूनच या सर्व्हरवर एअर इंडियाचे अभियंते काम करत होते. सर्व्हर सुरळीत झाले असले तरी विमानसेवा मात्र अजूनही विस्कळीत असल्याचे समजते आहे.

अधिक वाचा : ‘कार हॅकर्स’ शोधण्यासाठी पथके

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related