फ्लोरिडा मध्ये जॅक्सनव्हिले इंटरटेनमेंट कॉम्प्लेक्समध्ये एका बंदूकधारी व्यक्तीनं गोळीबार केला. त्यात दोन जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हल्लेखोराची ओळख डेव्हिड कट्झ अशी सांगण्यात आली आहे. तो 24 वर्षांचा असून बाल्टिमूरचा रहिवासी आहे. या घटनेनंतर त्यानं स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत त्याचा कुणी भागीदार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेत 11 जण जखमी झाले आहे.
जॅक्सनव्हिले लॅंडिंग या ठिकाणी व्हीडिओ गेम टुर्नामेंटच्या वेळी ही घटना घडली. जॅक्सनव्हिले लॅंडिंग हा मोठा मॉल आहे, त्या ठिकाणी दुकानं, रेस्तराँ आणि व्हीडिओ गेम्स पार्लर आहेत.
कट्झकडे फक्त हॅंडगन होती अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. तो व्हीडिओ गेममध्ये हरला त्यानंतर त्यानं गोळीबार केला असं वृत्तांकन स्थानिक माध्यमांनी केली होते. पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
गेल्या काही वर्षांत फ्लोरिडात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. 2016मध्ये पल्स नाइटक्लबमध्ये गोळीबार झाला होता. त्यावेळी 49 जण ठार झाले होते. पार्कलॅंडमधल्या मार्जरी स्टोनमन डग्लस शाळेत फेब्रुवारी महिन्यात गोळीबार झाला होता. त्यात 17 जण ठार झाले होते.
अधिक वाचा : केरळ महापूर : यूएई ची ७०० कोटी मदत केंद्राने नाकारली!