भाजप लोकसभा निवडणुकीचा विदर्भातील प्रचाराचा नारळ फोडणार ; शहा-गडकरी प्रथमच एका मंचावर येणार

Date:

नागपूर – भाजपच्या अनुसुचित जाती आघाडीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाच्या निमित्ताने भाजपाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रथमच नागपुरात एका मंचावर दिसणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत विदर्भातील भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.

मागील साडेचार वर्षात भाजपाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरात कधीही एका मंचावर दिसलेले नाहीत. मात्र, आता भाजपच्या अनुसुचित जाती आघाडीच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा जाहीर समारोप 20 जानेवारी नागपुरात कस्तुरचंद पार्कवर आयोजित करण्यात आला आहे. या अधिवेशनात भाजपचे देशभरातून पाच हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या समारोपाच्या कार्यक्रमात शहा-गडकरी ही जोडी नागपुरात प्रथमच एका मंचावर दिसणार आहे.

गडकरी यांच्या अलिकडच्या वक्तव्यांवरून भाजपमधील सुंदोपसुंदी उघड होत आहे. अपयशाची जबाबदारी नेतृत्वाने घेण्याच्या मुद्यावरून गडकरी यांचे वक्तव्य आले. त्यावर त्यांना लगेच सारवासारव देखील करावी लागली होती. या सार्‍या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एका मंचावर दिसणार आहेत. याकार्यक्रमातून भाजप लोकसभा निवडणुकीचा विदर्भातील प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

अधिक वाचा : Nitin Gadkari holds up Indira as model of women empowerment

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related