मुंबई : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्करोगावर उपचारासाठीच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्याविषयीचा सर्वंकष प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन आहे. या संस्थेस कर्करोगावरील उपचाराच्या अनुषंगाने 25 कोटी रुपयांची यंत्रसामुग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी त्या ठिकाणी सर्व यंत्रसामुग्री बसविण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिले.
सदस्य सुधाकर कोहळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री.महाजन बोलत होते. या प्रश्नावरील चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, वीरेंद्र जगताप, डॉ. सुनील देशमुख, सुनील केदार यांनी सहभाग घेतला.
अधिक वाचा : कामगारांच्या बालकांसाठी मनपा सुरू करणार अटल बालसंगोपन केंद्र