नागपूर: महाराष्ट्रातील सर्व भाषिक व्यावसायिकांनी एकत्र येऊन एकमेकांना मदत करून आपला व्यवसाय कसा वाढेल याबद्दल विचार व कृती करण्याची क्षमता देणारा सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट मा. श्री. माधवराव भिडे, मुंबई यांच्या पुढाकाराने 2000 साली सुरू झाला. या व्यावसायिक संघटनेचे विश्वस्त म्हणून श्री अशोक दुगाडे, श्री रवींद्र प्रभुदेसाई, श्री अजित मराठे, श्री सुरेश हावरे, श्री विजय परांजपे तर श्री नरेंद्र बगाडे हे Secretary General म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रात 48 Chapters (शाखा) व 1900 हुन अधिक सक्रिय व्यावसायिक सभासद असलेली ही सगळ्यात मोठी संघटना आहे.

कसे करता येते नेटवर्किंग ?
SCGT चे सभासद दर 15 दिवसातून एकदा एकत्र येतात, एकमेकांना Business References दिले जातात व झालेल्या Business Done Deals जाहीर होतात. गेल्या 17 वर्षात 500 कोटी रु.हून अधिक व्यवसाय या मंचामुळे शक्य झाला आहे. 1 to 1, 1 to many, cross chapter, cross region या प्रकारच्या मीटिंग हे SCGT च्या यशाचं महत्वाचं सूत्र आहे. SCGT चा सभासद कुठल्याही चॅप्टर मध्ये जाऊन आपल्या व्यवसायाचे Presentation करू शकतो, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आपला व्यवसाय वाढविण्यास हा एक उत्तम मंच आहे.

विविध व्यावसायिकांचे ग्रुप्स
SCGT चे नॅशनल, इंटरनॅशनल Business Cells आणि वूमन विंग, Elite Chapter, Young Entrepreneurs Chapter, Members Development Program असे अनेक उपक्रम देखील आहेत. या व्यतिरिक्त विविध व्यावसायिकांचे ग्रुप्स तयार करण्यात आले आहेत. स्पर्धा टाळून एकमेकांना पूरक व्यवसाय या ठिकाणी केला जातो.

विदर्भातील सदस्यांच्या व्यवसाय वाढीसाठी सॅटर्डे क्लब नागपूर शाखेद्वारे शनिवार, दिनांक 11/08/2018 रोजी  हॉटेल अशोका, लक्ष्मीनगर येथे विदर्भस्तरीय क्लस्टर मीट आयोजित करण्यात आली आहे. ह्या परिषदेला नागपूर, अमरावती, अकोला तसेच जळगाव, मुंबई व पनवेल येथील सभासद देखील उपस्थित असणार आहेत.

११ ऑगस्ट रोजी  सायंकाळी 4.30 ते 6.00 क्लब मेंबर्स नसलेल्या व्यावसायिकांसाठी खास सत्र

हॉटेल अशोका, आठ रस्ता चौकजवळ, लक्ष्मीनगर, नागपूर येथे आयोजित केलेल्या विशेष माहिती सत्रात Saturday Club तसेच त्याच्या कार्यपद्धतीविषयी संपूर्ण माहिती दिल्या जाईल. व्यवसायात येणार्‍या अडचणी ओळखणे, त्यावर मात करणे आणि व्यवसाय वाढवणे या तीनही टप्प्यावर सहय्यभूत ठरणार्‍या सॅटर्डे क्लब बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या सत्राला अवश्य उपस्थित राहावे. आवाहन विदर्भ रिजनल सेक्रेटरी श्री. सुभाष गोरे, नागपूर चॅप्टर अध्यक्ष सौ. नलिनी लांजेवार व सचिव श्री. समीर पिंपळीकर ह्यांनी केले आहे (प्रवेश निःशुल्क – सायंकाळी 4.30 ते 6.00)