नवी दिल्लीः सॅमसंगचा लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी झेड फ्लिप चा पहिला सेल काल पार पडला. सॅमसंग इंडियाच्या ऑनलाइन स्टोरवर या फोनची प्री बुकिंग करण्यात आली होती. परंतु, अवघ्या तासाभरात हा स्मार्टफोन आउट ऑफ स्टॉक झाला आहे. या फोनची किंमत तब्बल १ लाख १० हजार रुपये इतकी आहे. या फोनची फुल पेमेंट दिल्यानंतर तो बुकिंग करता येतो. या फोनची विक्री येत्या २६ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप (Samsung Galaxy Z Flip) मध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस डायनेमिक अॅमोलेड डिस्प्ले आहे. तर फोल्ड केल्यानंतर १.१ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले मिळतो. दुसरा डिस्प्ले हा नोटिफिकेशन, वेळ पाहणे, आणि संगीत ऐकण्यासाठी आहे. या डिस्प्ले वरून संगीत चालू-बंद करता येऊ शकते. या फोनचे वजन १८३ ग्रॅम आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. यात ७ नॅनोमीटरचा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस प्रोसेसर आहे. याचा क्लॉक स्पीड २.९५ गीगाहर्ट्ज आहे
(Samsung Galaxy Z Flip) या फोनमध्ये १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तर रियर पॅनलवर दोन कॅमेरे दिले आहे. दोन्ही कॅमेरे १२ मेगापिक्सलचे देण्यात आले आहेत. यात एक लेन्स वाइड अँगल आणि दुसरा अल्ट्रा वाइड आहे. कॅमेऱ्यासोबत ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन दिला आहे. गॅलेक्सी झेड फ्लिपमध्ये ३३०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये वायरलेस पॉवर शेअर सुद्धा आहे. याच्या मदतीने अन्य दुसरा फोन चार्ज करता येऊ शकणार आहे. फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर सह फेस अनलॉक दिला आहे.
Also Read- Samsung Launches Galaxy A51 in India with Awesome Features and Cool ‘Make for India’ Innovations