मोहनीश बहलच्या मुलीला सलमान खान करणार बॉलिवूडमध्ये लाँच

Date:

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान अनेक नवोदित कलाकारांसाठी गॉडफादर आहे. कतरिना कैफ, डेझी शाह, जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा अशा बऱ्याच कलाकारांना त्याने बॉलिवूडमध्ये आणलं.

एखाद्या नवोदित कलाकारावर सलमानचा वरदहस्त असला की चित्रपटसृष्टीत त्याच्या प्रवेशाचा मार्ग निश्चित झालाच म्हणून समजा. अनेकांचे करिअर मार्गी लावणारा हा ‘भाईजान’ आता दिवंगत अभिनेत्री नुतन यांची नात आणि अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी प्रनुतन बहलला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याविषयीची माहिती दिली. मोहनीशची मुलगी प्रनुतनला सलमान बॉलिवूडमध्ये संधी देणार आहे. या चित्रपटात प्रनुतनसोबतच आणखी एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे झहीर इक्बाल. सलमानच्या मदतीने हे दोन नवोदित कलाकार त्यांच्या करिअरचा शुभारंभ करणार आहेत.

मोहनीश बहल आणि सलमान या दोघांमधले मैत्रीचे नाते तसे जुनेच. ‘हम आपके है कौन?’, ‘हम साथ साथ है’ यांसारख्या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केले. या दोन्ही चित्रपटांत मोहनीशने सलमानच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती.

अधिक वाचा : ‘बधाई हो’ ट्रेलर लॉन्च : जानिये आयुष्मान की ‘खुशखबरी’ का राज

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related