नागपूर : प्रेम आपल्या आयुष्यात सर्वात अनपेक्षित आणि अकल्पनीय अशा गोष्टी करायला भाग पडते अगदी पहिल्यापासून प्रेम हि संकल्पना अस्तित्वात असून तरुण प्रेमी युगुलांच्या अनेक कथा इतिहासात सांगण्यात आल्या आहेत आपल्या अमर प्रेमाने ते भावी पिढ्यांना प्रेरणा देतात. प्रेमाचा संकेत असलेल्या प्राण्याची शक्ती आता अनुभवायला खुद्द तुमच्या शहरात.
नागपूर शहरात ह्याआधी कधीही पाहण्यात न आलेल्या भव्य असे अगदी आयकॉनिक पोज मधील दोन प्रेमींचे २३ फूट उंची शिल्प पाहायला तुम्हाला निश्चितपणे आवडेल. ह्या शिल्पाचे अनावरण लोकप्रिय सैराट जोडी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी केले.
भारतातील सर्वात दीर्घप्रतिक्षेत महान प्रेमगाथा कसोटी जिंदगी के आपली ” प्रेमाची प्रतिमा ” उभारण्यासाठी सज्ज असून ह्या घटनेला अविस्मरणीय बनविण्यासाठी स्टारप्लस पुरेपूर तयारी करत आहे. प्रेमाचे हे प्रतीक अनावृत करण्याच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या शहरात अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत.
प्रेमाची जादू असलेल्या ह्या शिल्पाचे अनावरण तुमच्या आवडत्या सिताऱ्यांना करतांना पहा. हे भव्य शिल्प अनेक महिन्यांच्या अथक मेहनतीचा परिणाम आहे . हि शिल्पे कोलकत्ता येथे विख्यात शिल्पकार श्री,भाबातोष सुतार यांनी बनवली आहेत. २३ फूट उंचीचे हे शिल्प बनवणे हए काही सोपे काम नव्हते. श्री सुतार आणि त्यांच्या टीमने अनेक रात्री जागवून मेहनत घेतली असून अंतिम परिणाम निश्चितपणे वाखाणण्याजोगा आहे.
हे उत्कृष्ट नमुने बनविण्यासाठी सुमारे ४५ दिवासांचा अवधी लागला असून २० कारागिरांच्या टीमने ह्यावर रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. १० सप्टेंबर रोजी देशभरातील १० शहरे मुंबई, दिल्ली, नोएडा, पुणे, नागपूर, नाशिक, राजकोट, वडोदरा, सुरत आणि अहमदाबाद येथे एकाच वेळेस हि शिल्पे अनावृत करण्यात येणार आहेत. एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेली प्रेमी युगुलांचे भव्य शिल्प लोकांना पाहायला मिळेल.
लाल रंगाच्या ओढणीने झाकलेले हे शिल्प हि ओढणी काढून अनावृत करण्यात येईल. हे अनावरण करतांना अतिशय आनंदात असलेली पडद्यावरील हि जोडी म्हणाली, “आम्हाला खूप आनंद होत आहे कि स्टारप्लस ने प्रेम आणि प्रणयाचे हे शिल्प अनावृत करण्याची संधी मला दिली. ह्या शहरात जे धावपळीचे आयुष्य आपण जगात आहोत, त्यात कसौटी जिन्दगी की चे हे शिल्प आपल्या एक क्षण थांबून प्रेमाबद्दल विचार करायला लावेल. आम्हाला खात्री आहे की हा प्रेमी युगुलांचा नवीन सेल्फी पाईट बनेल. आम्ही खूप उत्साहात आहोत की आम्ही लहानपणी जी ,मालिका पाहायचो ती आता परत येत आहे आणि ती पाहण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत.
अधिक वाचा : ‘स्त्री’ला टक्कर देतेय हॉलिवूडची ‘द नन’