RRB Group D Exam 2021: तब्बल 1 लाखापेक्षा अधिक जागांसाठी होणार पदभरती; लवकरच होणार आयोजन

Indian Railways

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट: NTPC मध्ये भरतीची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आता RRB Group D ची भरतीही (RRB Group D Exam 2021) लवकरच होण्याची शक्यता आहे. रेल्वेकडून  2019 मध्ये ग्रुप डी ची 1 (RRB group D) लाखांपेक्षा जास्त पदं  भरण्याची घोषणा केली होती. पण कोरोनामुळे ही भरती प्रक्रिया लांबली. आता परिस्थिती सुधारल्यामुळे रेल्वेनं प्रलंबित ठेवलेली ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, रेल्वे ग्रुप-डी भरती परीक्षेच्या तारखा या आठवड्यात जाहीर केल्या जाऊ शकतात.

खरं म्हणजे NTPC आणि ग्रुप D (RRB group D recruitment) च्या पदांवर भरतीसाठी रेल्वेनं एकाच वेळी अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. मात्र NTPC भरती परीक्षा पूर्ण झाली आहे. अशा स्थितीत आता ग्रुप -डीची भरती परीक्षाही लवकरच सुरू होऊ शकते. परीक्षा संबंधित अपडेट्ससाठी उमेदवारांनी RRC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देत राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

अशी असेल निवड प्रक्रिया

रेल्वे ग्रुप-डी च्या पदांसाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना 3 टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतील. उमेदवारांना सुरुवातीला कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT मध्ये उपस्थित राहावं लागेल. या टेस्टमध्ये यशस्वी उमेदवारांना PET चाचणीसाठी बोलावलं जाईल. यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मेडिकल टेस्ट द्यावी लागेल.

असं असेल परीक्षेचं स्वरूप

CBT मध्ये 100 गुणांचे 100 प्रश्न उमेदवारांना विचारले जातील. ज्यासाठी त्यांना 90 मिनिटं दिली जातात. परीक्षेत, उमेदवारांना सामान्य विज्ञान, गणित, सामान्य जागरूकता, रिझनिंग , करंट अफेयर्स या विषयांमधून प्रश्न विचारले जातील. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगही असणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक 3 चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कापला जाणार आहे.

या भरतीची घोषणा अजून करण्यात आलेली नाही मात्र लवकरच या  पदभरतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.