नोकरभर्ती : आता रोबो घेत आहेत मुलाखती

Date:

नागपूर : मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरभर्तीसाठी आता मुलाखती घेणारे पॅनल बसवले जात नसून चक्क रोबो मुलाखती घेऊन लोकांची निवड करत आहेत. रोबोटिक अॅलगोरिदमिक सॉफ्टवेअरच्या साहाय्याने अनेक कंपन्या इच्छुकांच्या व्हिडिओ मुलाखती घेत आहेत.

एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास आणि इतर गुण जाणून घेण्यासाठी या रोबॉटिक सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. मुलाखत देण्यासाठी आलेल्यांच्या डोळ्यांमधील आणि चेहऱ्यांवरील हावभाव वाचण्याचं काम हे सॉफ्टवेअर करतं. समोरच्या माणसामध्ये किती आत्मविश्वास आहे, तो घाबरतो की शांत राहतो अशा सर्व गोष्टींचा अभ्यास या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने करणं सोपं जातं. परदेशात नाही तर भारतातही या पॅनलचा वापर करणं सोपं जातं. अॅक्सिस बँकेने या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने ४० हजार लोकांच्या मुलाखती घेऊन २००० जणांची नोकरभर्ती केली आहे. बजाज अलायन्सनेही या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने १६०० जणांची नोकरभर्ती केली आहे. यात अंडररायटरपासून असिस्टंट मॅनेजरपर्यंतच्या पदांवर भर्ती करण्यात आली आहे. नि:पक्षपातीपणे नोकरभर्ती करणं या सॉफ्टवेअरमुळे सोपं जातं अशी माहिती बजाज अलायन्सचे प्रमुख एचआर ऑफिसर विक्रमादित्य सिंह यांनी दिली आहे.

तर चांगली उत्तर अनेक जण देतता पण या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने उत्तर देताना त्यांच्या मनात काय विचारचक्र सुरु आहे याचा शोध लावता येऊ शकतो अशी माहिती टेल्व्यू कंपनीचे सीईओ संजीव मेनन यांनी दिली आहे.

हे सॉफ्टवेअर योग्य उमेदवाराची निवड करण्यास मदत करत असलं तरीही ते परिपूर्ण नाही. जर भावनांवर नियंत्रण मिळवलं तर या सॉफ्टवेअर्सलाही आरामात फसवता येऊ शकतं अशी माहिती सेंटर फॉर इंटरनेट अॅंड सोसायटीचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सुनील अब्राहम यांनी दिली आहे. तेव्हा येत्या काळात हे सॉफ्टवेअर्स किती प्रभावी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा : MHT-CET निकाल जाहीर ; मुंबईची किमया, अमरावतीचा सिद्धेश टॉपर

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...