भाजपा दक्षिण-पश्चिम नागपूरचा निवासी अभ्यासवर्ग

नागपूर : २५ जुलै २०१९ भारतीय जनता पार्टी, दक्षिण-पश्चिम क्षेत्रातील सर्व बूथप्रमुख, शक्तिप्रमुख, नगरसेवक, नगरसेविका, शहर-मंडळ पदाधिकारी यांचा अभ्यासवर्ग दिनांक २७ व २८ जुलै २०१९ रोजी अमरावती रोडवरील वाघउमरी तालुका हिंगणा येथील “वाघविला” येथे आयोजित करण्यात आला आहे.

या अभ्यासवर्गाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री माननीय श्री. नितीनजी गडकरी व राज्याचे पालकमंत्री व ऊर्जामंत्री माननीय श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, शहर भाजपा चे अध्यक्ष श्री. प्रवीणजी दटके यांच्या शुभहस्ते होणार असून रविवारी दुपारी ३ वाजता समारोप मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस हे करणार आहेत. अभ्यासवर्गात विदर्भाचे संगठनमंत्री डॉ.उपेंद्रजी कोठेकर, सत्तापक्षनेता मा.संदीपजी जोशी, यांचे मार्गदर्शन लाभणार आहेत.

अभ्यासवर्गात विविध संघटनात्मक सत्र घेण्यात येणार असून अभ्यासवर्गाची संपूर्ण व्यवस्थांकडे मंडळ अध्यक्ष श्री. रमेश भंडारी, महामंत्री श्री. आशिष पाठक सचिन कारळकर, श्रीपाद बोरीकर, सुरेंद्र पांडे, मंडळ संपर्क प्रमुख श्री गजानन निशितकर हे लक्ष देत आहे.

अधिक वाचा : The Magnificent 7 : The new BMW 7 Series arrives in India