भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात रेस्क्यू टिमला यश

Date:

नागपुर (प्रतिनिधी) : खापा घुडणं येथूनच अगदी ५ किमी च्या अंतरावर असलेले गाव हिवरमठ (ता. नरखेड) येथील हिवरमठ शिवारात भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला. ही घटना सोमवार ला घडली, परिसरातील ग्रामस्थांसह शेतकर्‍यांना या घटनेची माहिती मिळताच बिबट्याला बघायला मोठी गर्दी झाली. माहिती नुसार हिवरमठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हिवरमठ येथील शेतकरी पूरुषोत्म गोरे यांचे शेत गावा लगत असून येथे विहीर आहे.सोमवारी शेतात आंघोळ करण्यासाठी काही लोक गेले असता गोरे यांच्या विहिरीत बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले. हिवरमठ परिसरात सैय्यद मुमताजअली सांचेपीर औलीया जूलूस चा कार्यक्रम दर वर्षी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरीक साजरा करत असतात त्यासाठी शनिवार पासुन तयारी चालू होती हजारोच्या संख्येत नागरीक या जूलूस मध्ये सहभागी होतात..याच तयारी करीता थांबलेले काही युवक आंघोळी साठी गोरे यांच्या शेतातील विहीरीवरती गेले त्याना बिबट असल्याचे दिसताच त्यानी त्वरित या घटनेची माहिती वनविभागला दिली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वन परिक्षेत्र अधिकारी नरखेड कांतेश्वर बोलके यानी घटणेची माहीती मिळताच व लोकांची गर्दी पाहता पोलिस व रेस्क्यू टिमला बोलावले .विहीरीत पडलेल्या बिबट ला बघण्यासाठी लोकांची गर्दी लोटलेली होती. तब्बल २ तासाच्या अथक प्रयत्नाने रेस्क्यू टिमला यश आले .

विहिरीत पडलेल्या बिबटला काढण्यासाठी नागपूर वरुन रेस्क्यू टिमला बोलावणे केले होते. बिबट्या काढणे अवघड असल्याने पाचारण केलेल्या टिमला सुध्दा सहजशक्य नव्हते. बिबट ला काढणसाठी २ तास रेस्क्यू टिमला तारेवरची सरकस करावी लागली. २ तासानंतर रेस्क्यु टिमला बिबट काढण्यात यश आले. बिबट हा शिकार करण्याच्या हेतूने विहीरीत पडला असा अंदाज वन अधिकारी यांनी दाखवला या भागात बिबट असल्या बाबत गाव डवंडी माध्यमातून सुचना देण्याचे काम सुरू होते.

विहिरीत पडलेला बिबट नर जातीतील असून बिबटचे वय ४ वर्ष अं.असुन जवळ पास ६५ त ७० किलो वजन असल्याचे सांगितले जाते. बिबटला प्रथम उपचारासाठी नागपूर येथे पाठवण्यात आले. यावेळी वन विभागातील वन परिक्षेत्र अधिकारी नरखेडचे कांतेश्वर बोलके, एस.एन.सीरसागर सा.व.स्व.नागपूर /काटोल,डॉ बीलाल पशु अधिकारी, सै.निशा देशमुख , मुंडे, सुझेन चाटे ,मोरेश्वर काबळे ,दिपक अतरकर, रघूनाथ बागडे, महादेव सहारे, गौतम मडके, घटणास्थळी ऊपस्थित होते.

अधिक वाचा : फूलों के हजारों रंग, नागपूर में फ्लावर शो का आयोजन

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

International Dance Day 2024 : Date History Significance Wishes & Quotes..

April 29th of every year is known as World...

Complex Thumb Re-plantation Surgery at Krims Hospital – A Remarkable Medical Achievement

Nagpur: A remarkable medical feat unfolded at KRIMS Hospital...

10 Best Cafe Restaurants in Nagpur 2024

Nagpur, a city in Maharashtra, is well-known. It's not...