राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी कार्यक्रम

Date:

नागपूर : सर्वधर्म समभाव जनसामान्यात रुजवून या ‘भारतात बंधू भाव नित्य वसू दे’ असा राष्ट्रहितार्थ विचार देऊन राष्ट्रधर्म जागविणारे ,कष्टकरी समाजाच्या सर्वांगिक उन्नतीचा ध्यास ठेऊन सामुदायिक प्रणाली चा आग्रह करणारे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण होऊन ५० वर्ष पूर्ण झाली आहेत.

सुवर्ण पुण्यतिथी वर्षाच्या निमित्याने श्रीगुरुदेव सेवा मंडळ, नागपूर संचालित श्रीगुरुदेव सेवाश्रम, सुभाष रोड, नागपूर येथे दि. २४ व २५ नोव्हेंबर २०१८ रोजी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवसीय पर्वा मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे.  कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री प्रकाश महाराज वाघ यांच्या हस्ते होत असून कार्यक्रमाला श्री. नितीनजी गडकरी, मा. प्रा. नंदाताई जिचकार, श्री. विलास मुत्तेमवार, डॉ. सिद्धार्थ काणे, डॉ. भूषणकुमार उपाध्याय, श्री. विकास ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहे.

अधिक वाचा : नागपूर में होगा अमर शहीद क्रांतीकारियों का भव्य कार्यक्रम

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related