नालासोपारा: मुंबईत कोरोनाच्या परिस्थितीमुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण, गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे. मुंबईजवळील नायगाव परिसरात एका 25 वर्षीय अभिनेत्रीसह तिच्या बहिणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित अभिनेत्रीने वालीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नायगाव परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय पीडित अभिनेत्रीला आरोपी महासुबेर परिद याने दारूमधून गुंगीचे औषध दिले होते. त्यानंतर पीडितेसोबत अश्लिल चाळे केले. त्यानंतर या नराधमाने पीडितेच्या बहिणीवर अत्याचार केला. तर महासुबेर परिद याचा मित्र आरोप रमेश याने दोन्ही बहिणीचे हात आणि पाय धरून स्वत: जवळ ओढून अश्लिल चाळे केले. तर यावेळी आरोपी सुधीर चंद्रशेखर, अभिनव विख्यात आणि जगन्नाथ यांनी दोन्ही बहिणींसोबत गैरकृत्य केले. त्यांना कपडे काढून अश्लिल व्हिडीओ रेकॉर्ड केले. या दोन्ही पीडित बहिणींनी याला विरोध केला होता.
पण, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली तसंच जीवे मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार 24 ते 29 एप्रिलच्या दरम्यान कर्नाटकमध्ये घडला आहे. पीडित तरुणी मुंबईत दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे.