चेन्नई: प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांनी अखेर आपली राजकीय कारकीर्द सुरू करण्याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. रजनीकांत यांनी गुरूवारी सांगितले की जे जानेवारी २०२१मध्ये आपला पक्षाची सुरूवात करतील आणि आपल्या या पक्षाबाबत घोषणा ते ३१ डिसेंबरला करतील. आपल्या एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, आता सगळं काही बदलण्याची वेळ आली आहे. आता नाही तर कधीच नाही. त्यांनी पुढे म्हटले की, आगामी विधानसभा निवडणुकीत आमचा निश्चितच विजय होईल. आम्ही लोकांना एक पारदर्शक, भ्रष्टाचार मुक्त आणि कोणत्याही प्रकारचा धार्मिक तसेच जातीय भेदभाव न कराणारे सरकार देऊ. रजनीकांत यांनी याआधीच तामिळनाडूमधी लोकांना एक राजकीय पर्याय देण्याचे सांगितले होते. त्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली आहे.
माझ्या जीवनाचे बलिदान देण्यास तयार
रजनीकांत यांनी म्हटले की, तामिळनाडूच्या जनतेसाठी ते आपल्या जीवनाचे बलिदान देण्यासाठी तयार आहेत. राज्यात राजकीय बदल गरजेचे आहे. मी २०१७मध्ये राजकी पक्ष सुरू करण्याबाबत बोललो होतो. मी म्हटले होते की मी २०२१मध्ये विधानसभा निवडणूक लढवणार.
अभिनेते म्हणाले, राजकीय पक्ष सुरू करण्याआधी मी क्षेत्रातील लोकांशी जाऊन भेटणार होतो. मात्र डॉक्टरांनी मला जनसंपर्क टाळण्यास सांगितले. जेव्हा मी आजारी होतो. तेव्हा तुमच्या प्रार्थनांनीच मला बरे केले. माझ्या जीवनाचा अंत झाला तरी मी त्याची पर्वा करणार नाही. जर माझा विजय झाला तर तो तुमचा सगळ्यांचा असेल.
तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी निवडणूक
अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या रजनीकांत यांनी आपल्या पक्षाची घोषणा ठीक विधानसभा निवडणुकीआधी केली आहे. राज्यात पुढील वर्षी निवडणूक आहे. रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांच्या एक राजकीय समूह रजनी मक्कल मंद्रमच्या जिल्हा सचिव तसेच त्यांच्या सदस्यांशी भेट घेतली होती. यानंतर असे म्हटले जात होते की ते लवकरच याबाबत घोषणा करतील.
२०१७मध्ये केली होती पक्ष सुरू करण्याची घोषणा
रजनीकांत यांनी डिसेंबर २०१७मध्ये आपला राजकीय पक्ष स्थापणार अशी घोषणा केली होती. असं म्हटले जाते यानंतर अभिनेता आपल्या आरोग्याच्या कारणामुले या दिशेने पुढे जाऊ शकले नाहीत. डॉक्टरांनी त्यांचे आरोग्य पाहता त्यांना व्यस्त राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. या वर्षाच्या सुरूवातीला त्यांनी पक्षाचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणाले होते त्यांचा पक्ष निवडून सत्तेत आल्यास मुख्यमंत्री पदावर ते योग्य आणि शिक्षित उमेदवारास पसंती देतील.