बीडमध्ये डीवायएसपींना धक्काबुक्की, लसीकरण केंद्रावरील गर्दीवर नियंत्रण आणतांना घडला प्रकार

बीडमध्ये डीवायएसपींना धक्काबुक्की, लसीकरण केंद्रावरील गर्दीवर नियंत्रण आणतांना घडला प्रकार

बीड: बीड जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज बुधवारी मोठी गर्दी झाली होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच स्वतः डीवायएसपी वाळके हे त्या ठिकाणी गेले. यावेळी गर्दीवर नियंत्रण आणतांना वाळके यांनाच धक्काबुक्की झाली. यात त्यांच्या गळ्याला जखम झाली.

बीड जिल्ह्यात बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. या दरम्यानच मंगळवारी रात्री लसीचा मोठा स्टॉक उपलब्ध झाल्यानंतर बहुतांश केंद्रांवर लसीकरण सुरु करण्यात आले आहे. परंतु लसीकरण केंद्रांची संख्या कमी असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर बुधवारी सकाळी मोठ्या प्रमाणात लोक लसीकरणासाठी आले होते.

याबाबतची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके हे त्या ठिकाणी पथकासह पोहचले. यावेळी गर्दी नियंत्रणात आणतांना त्यांना धक्काबुक्की झाली. यात त्यांच्या गळ्याला जखम झाली असून या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य तिघांचा शोध पोलिस घेत आहेत.