गुंडाचा दोन तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

नागपूर

नागपूर : गुंडाव्दारे भररस्त्यात दोन तरुणावर हल्ला करून जिवे ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना महाल येथे घडली असून प्रवीण लक्ष्मीकांत घाटे वय (२१) वर्ष रा.महाल कोठी रोड व लाभेश किशोर गायकवाड ( २२) रा.सुभाष रोड अशी जखमीची नावे आहेत.

प्रवीण व लाभेश हे दोघे १२ मार्च रोजी रात्री महाल येथील राजेंद्र हायस्कूल जवळ बाबा पान पँलेस गल्लीत चहा पिण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान आरोपी सोनू पवार वय ४० वर्ष रा. गाडीखाना , हा त्याच्या अन्य साथीदारांना घेऊन तेथे पोहचला व जुन्यावादातून आरोपींनी दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना जिवे ठार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा : पोलिस दलातील जवानाचा भाऊ एमडी तस्करीत

Comments

comments