नागपूर च्या शमीम सलूनमध्ये हायप्रोफाइल देहव्यापार, मालकाला अटक

नागपूर च्या शमीम सलूनमध्ये हायप्रोफाइल देहव्यापार, मालकाला अटक

नागपूर : गिरीपेठेतील जगत मिलिअम अपार्टमेंटमधील  शमिम हेअर ब्युटी प्रोफेशनल सलूनमध्ये सुरू असलेला हायप्रोफाइल देहव्यापार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला.

मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून मालकाला अटक केली. पीडित ३५ वर्षीय महिलेची सुटका केली. मोहम्मद शमीम अब्दुल करीम अन्सारी (वय ५१,रा.जाफरनगर ) , याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

तीन वर्षापूर्वी शमीम याने जगत मिलिनियम अपार्टमेंटमध्ये सलून सुरू केले. येथे तो हायप्रोफाइल देहव्यापार अड्डा चालवित होता. ग्राहकांना व्हॉट्सअॅपद्वारे तरुणींचे छायाचित्र पाठवित होता. ग्राहकाने तरुणीची निवड केल्यास त्या तरुणीला तो सलूनमध्ये बोलावून तिच्याकडून देहव्यापार करवून घेत होता. याबाबत गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांना माहिती मिळाली. त्यांनी येथे छापा टाकण्याचे निर्देश दिले.

सहायक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर, सहायक निरीक्षक अनुपमा जगताप, उपनिरीक्षक प्रिती कुळमेथे, अजय जाधव, सामाजिक कार्यकर्त्या विजयारणी रेड्डी , नूतन रेवतकर यांनी सायंकाळी सापळा रचून येथे छापा टाकला. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका करून शमीमला अटक केली.

अधिक वाचा : नागपुरात एकाच कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनीची आत्महत्या

Comments

comments