विश्वभर योगविज्ञानाचा प्रसार ही भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

Date:

नागपूर : “पूर्ण विश्‍वात आंतरराष्‍ट्रीय योग दिवस उत्‍साहाने साजरा होतो आहे. भारतीय संस्‍कृती, इतिहास व वारसा यांचे प्रतीक योगशास्‍त्र आहे व जगामध्‍ये याला मान्‍यता मिळाली आहे, ही भारतीयांसाठी अभिमानास्‍पद बाब आहे “, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले.

स्‍थानिक यशवंत स्‍टेडियम येथे नागपूर महानगर पालिका व केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांच्या नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्‍व योग दिवसाच्‍या निमित्‍ताने आयोजित कार्यक्रमाच्‍या प्रमुख अतिथींच्या स्‍थानी ते बोलत होते.

जनार्दन स्‍वामी योगाभ्‍यासी मंडळ, गायत्री परिवार, मैत्री परिवार संस्‍था, श्रीरामचंद्र मिशन, नागपूर जिल्‍हा योग असोसिएशन व जिल्ह्यातील इतर योग प्रेमी संस्‍थांच्‍या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. याप्रसंगी नागपूरच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार जिल्‍हाधिकारी अश्विन मुद्गल, मनपा आयुक्‍त अभिजित बांगर, जनार्दनस्‍वामी योगभ्‍यासी मंडळाचे कार्यवाह रामभाऊ खांडवे, प्रामुख्‍याने उपस्थित होते.

दैनंदिन योग अभ्‍यासामूळे स्‍वास्थ चांगले राहते. नागपूरच्‍या कार्यक्रमामध्‍ये सहभागी झालेल्‍या योगसाधकांनी योग अभ्‍यासाचा अवलंब करावा व आपले जीवन स्‍वस्‍थ्‍य व निरोगी ठेवण्‍यात यशस्‍वी व्‍हावे, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. या योगप्रसाराच्‍या कार्यात जनार्दन स्‍वामी योगाभ्‍यासी मंडळ व इतर योग प्रेमी संस्‍थाचे कार्य प्रशंसनीय आहे, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी विविध संस्‍थाकडून योगासनांची प्रात्‍याक्षिक करून दा‍खविण्‍यात आली. या कार्यक्रमास नागपूरातील योगसाधक, नागरिक, शालेय विद्यार्थी बहुसंख्‍येने उपस्थिति होते.

अधिक वाचा : विराट कोहली बने क्रिकेट मैदान के बाहर भी ‘विराट’, सचिन तेंदुलकर को पछाड़ा

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...