गोदामात छापा, सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

नागपूर गुन्हेशाखेच्या युनिट चारने सुराबर्डी येथील गोदामात छापा टाकून सुगंधित तंबाखू व गुटख्याचा साठा जप्त केला.

nagpur, नागपूर सुराबर्डी

नागपूर – गुन्हेशाखेच्या युनिट चारने सुराबर्डी नागपूर येथील गोदामात छापा टाकून सुगंधित तंबाखू व गुटख्याचा साठा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी मनोहर निळकंठ लाखनकर (वय ६०) या व्यापाऱ्याला अटक केली.

लाखनकरचे किराणा दुकान असून, बाजूलाच गोदाम आहे. गोदामात त्याने गुटख्याचा साठा लपवून ठेवल्याची माहिती गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांना मिळाली. मेश्राम यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम मोहेकर, सहाय्यक उपनिरीक्षक बट्टुलाल पांडे, नागोराव इंगळे, रमेश उमाटे, सुधाकर धंदर, कृपाशंकर शुक्ला यांनी गोदामात छापा टाकला. पोलिसांनी सुगंधित तंबाखू व गुटख्याचा साठा जप्त केला. लाखनकर हा मध्यप्रदेशातील गुप्ता नावाच्या व्यापाऱ्याकडून गुटखा आणायचा. पोलिस गुप्ताचा शोध घेत आहेत.

Also Read- ‘यू ट्युब’ वरून वाहनचोरीचे प्रशिक्षण