नागपूर : दारूतस्कराला सिनेस्टाइल अटक

Date:

नागपूर : बेलतरोडी पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून दारूतस्कराला अटक केली. त्याच्याकडून कार व मद्यसाठा जप्त केला. स्वप्निल वसंतराव वासेकर (वय ३४,रा. एमआयडीसी),असे अटकेतील तस्करांचे नाव आहे. स्वप्निल हा दारूबंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी करतो.

बुधवारी दुपारी स्वप्निल हा कारमध्ये दारू घेऊन जात असल्याची माहिती बेलतरोडी पोलिसांना मिळाली. बेलतरोडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय तलवारे, निरीक्षक दिलीप साळुंखे, हेडकॉन्स्टेबल रणधीर दीक्षित, शिपाई विजय श्रीवास, गोपाल देशमुख, रितेश ढेगे, नितीन बावने, प्रशांत सोनुलकर, कमलेश गणेर, राजेंद्र नागपुरे यांनी नरेंद्रनगर भागात सापळा रचला.

स्वप्निल हा एमएच-३१-सीपी-५७६० या क्रमांकाच्या कारमधून दारू घेऊन जाताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला कार थांबविण्याचा इशारा केला. मात्र न थांबता त्याने कारचा वेग वाढविला. पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडून २४० विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.

अधिक वाचा : नागपूर – गोळीबाराने हादरले मानकापूर

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related