लॉकडाउन वाढणार का?; पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता साधणार संवाद

Date:

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करतील. पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. आपल्या संबोधनाद्वारे ते कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने घेतल्या उचललेल्या पावलांबाबत जनतेला माहिती देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावेळी ते लॉकडाउनबाबत महत्त्वाची घोषणा करतील अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करत ही माहिती दिली. आपल्या संबोधनादरम्यान आणखी नवा निर्णय घोषित करतील का, देशातील आर्थिक स्थितीला उभारी देण्यासाठी ते काही उपाय योजना सूचवतील का, किंवा काही ठिकाणी ते लॉकडाउन शिथील करतील का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पंतप्रधानांच्या संवादादरम्यान मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने घोषित केलेला देशव्यापी लॉकडाउनचा तिसरा टप्पा येत्या रविवारी, १७ मे रोजी पूर्ण होत आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आणि लॉकडाउनबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन आणखी वाढवण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले आहे.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related