मुंबई: इंडियन आयडल १२ ची ट्रॉफी पवनदीप राजन याने जिंकली आहे. अनेक स्पर्धकांना मागे टाकत अखेर तो या शोचा विजेता बनला. २५ लाखांच्या बक्षिसाच्या रकमेसह पवनदीप राजन लक्झरी कारचा मानकरी ठरला आहे.
देशातील सर्वांत लोकप्रिय रिॲलिटी शो दीर्घकाळ आणि अनेक चढ-उतारांनी भरलेलं होतं. कोरोना काळात हा शो सुरु झाला. मध्यंतरी अशी एक वेळ आली की, जेव्हा शोचे शूटिंग, शेड्यूल आणि लोकेशन सर्वकाही चेंज करावं लागलं.
या शोचा विजेता कोण असणार, याचीच सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. पण, १५ ऑगस्ट रोजी इंडियन आयडलचा विनर ठरला. पवनदीप राजनने या शोची ट्रॉफी जिंकली. तसेच २५ लाख रुपये आणि लख्झरी कारदेखील मिळवले.
हे स्पर्धक पोहोचले अंतिम फेरीपर्यंत
दुसऱ्या क्रमांकावर अरुणिता कांजीलाल तर तिसऱ्या क्रमांकावर सायली कांबळेने स्थान पक्के केले.
चौथ्या क्रमांकावर मोहम्मद दानिश, पाचव्या क्रमांकावर निहाल आणि शनमुखप्रियाला सर्वात कमी मते मिळाली. ती सहाव्या क्रमांकावर राहिली.
यावेळी फिनालेच्या रेसमध्ये स्पर्धकांना खूप आव्हानात्मक संघर्ष करावा लागला. स्पर्धकांनी आव्हानांचा सामना करत आणि दमदार परफॉर्मन्स देत टॉप सहामध्ये येण्यासाठी मेहनत घेतली.
ही पहिलचं वेळ होती की, जेव्हा इंडियन आयडलच्या फिनालेमध्ये ५ च्या जाग ६ कंटेस्टेंट्सने स्थान मिळवले.
पवनदीप राजन, मोहम्मद दानिश, शनमुखप्रिया, अरुणिता कांजीलाल, निहाल आणि सायली कांबळेने फिनालेपर्यंतचा प्रवास पूर्ण केला.