पी. व्ही. सिंधू थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत

Date:

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू ने थायलंड ओपन वर्ल्ड सुपर 500 स्पर्धेत मलेशियाच्या सोनिया चिहला सरळ गेममध्ये नमवित महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

दुसर्‍या मानांकित सिंधूने जागतिक क्रमवारीत 35 व्या स्थानी असलेल्या सोनियाचा 21-17, 21-13 असा अवघ्या 36 मिनिटांमध्ये पराभव करत पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानी असलेल्या सिंधूचा सामना पुढच्या फेरीत इंडोनेशियाच्या जॉर्जिया मारिस्का तुनजुंगशी होणार आहे.

सामन्याच्या सुरुवातीला सिंधूला म्हणावा तसा सूर गवसला नाही व गेमच्या मध्यंतरापर्यंत सोनियाकडे 11-7 अशी आघाडी होती. यानंतर सिंधूने आपला खेळ उंचावत 13-12 अशी आघाडी घेतली. पहिला गेम 21-17 असा जिंकत सिंधूने बाजी मारली.

सिंधूने दुसर्‍या गेममध्ये 6-3 अशी आघाडी घेतली. पण, सोनियाने खेळ उंचवत सामना 8-8 असा बरोबरीत आणला. दुसर्‍या गेमच्या मध्यंतरापर्यंत सिंधूकडे 11-9 अशी आघाडी होती. यानंतर सिंधूने सोनियाला कोणतीच संधी न देता विजय मिळवला.

अधिक वाचा : फिफा विश्‍वचषक २०१८ : तिसऱ्या स्थानासाठी आज लढत रंगणार

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related