नागपूर : परदेशात भारताची प्रतिष्ठा ही भारतीय संविधानामूळे असून अनेक देश भारतीय संविधानातील मूल्यांचे अनुकरण करत आहेल. विविधतेने समृद्ध असलेल्या देशाला एकसंघ ठेवण्याचे कार्य संविधान बजावत आहे. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली संविधान संस्कृति देशात रुजणे व संविधानाची माहिती जनसामान्यांपर्यत पोहचणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी केले. केंद्रीय खाण मंत्रालया अंतर्गत नागपूरच्या सिवील लाईन्सस्थित आय .बी .एम (भारतीय खाण ब्यूरो) मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 128व्या जयंती महोत्सवाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी खाण नियंत्रक (कंट्रोलर ऑफ माईन्स) श्री. पी. शर्मा तर सन्माननीय अतिथि म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविघालय, नागपूरच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गौतम कांबळे उपास्थित होते.
व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन प्रेम व विचारामूळे येते. महापुरूषांच्या जयंत्या साज-या केल्याने कारागृहातील कैद्याच्यांही विचारात परिवर्तन झाले. असे मत डॉ. उपाध्याय यांनी यावेळी मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या ग्रंथात रिझर्व बँक ऑफ इंडियाची संकल्पना मांडली. सायमन कमिशन, साऊथब्यूरो कमिटी समोर डॉ. आबेडकर केवळ शोषित समाजाचे नेते म्हणून नव्हे तर एक विशेषतज्ज्ञ व अर्थशास्त्री म्हणून गेले होते, अशी माहिती सन्माननीय अतिथि डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला संविधान निर्माते,समाजसुधारक म्हणून असे कंगोरे असले तरी त्यांचे व्याक्तिमत्व शिक्षणामूळे अधिक प्रगल्भ झाले होते .त्यांचे शिक्षणविषयक विचार आज आपण आत्मसात करायला हवे, असे मत श्री. पी. शर्मा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषाणातून मांडले.
आय.बी. एम.च्या खाण संस्करण विभागाच्या संचालिका यांनी बाबासाहेबांच्या महिला सक्षमीकरणासंदर्भात आपले विचार मांडतांना डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या लढ्यामुळेच स्त्रियांना सर्व क्षेत्रात समान अधिकार मिळाले आहेत, असे सांगितले.
या कार्यक्रमाला आय.बी.एम. च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती समितीचे सचिव श्री.रोकडे,बेग व आय.बी.एम. कार्यालयाच्या विविध आस्थापनांमधील कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय.बी.एम. कार्यालयाचे अशोक गवई यांनी केले.
अधिक वाचा : Hotstar Specials presents ‘The Office’ where work is optional, but fun is compulsory !