व्हिडिओ : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पानसरे कुटुंबियांची भेट घेतली

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील

कोल्हापुर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कोल्हापुरात उमाताई पानसरे व मेघाताई पानसरे यांची भेट घेतल्यानंतर टीव्ही मीडियाला दिलेली प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील सर्वसामान्य तरूणांची माथी भडकावून त्यांच्या हाती पिस्तुलं, बॉम्ब देणार्‍या सनातनी कट्टरवादी संघटनांवर बंदी घालण्यासाठी विचारवंतांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव निर्माण करावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. लहान-लहान गोष्टींवरही ट्वीट करून अभिनंदन करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्र एटीएसने डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या संशयीत मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर तपास अधिकाऱ्यांचे कौतुक करण्याचे साधे औदार्य दाखवत नाही. यावरून अशा विचारधारेला त्यांचे पाठबळ असल्याचे जाणवते. यासंदर्भात विखे पाटील पुरोगामी चळवळीतील अनेक मान्यवरांना भेटणार आहेत.

अधिक वाचा : ॲट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश