नागपूर :- स्वामी विवेकानंद यांची आज ११६ वीं पुण्यतिथी निमित्त शहरातील स्वामी विवेकानंद स्मारक अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो पॉईंट स्थित स्वामीजींच्या प्रतिमेला उपमहापौर श्री. दिपराज पार्डीकर यांनी म.न.पा.च्या वतीने पुष्पहार अर्पण केले तसेच स्मारकावर पुष्पअर्पण करुन आदरांजली दिली. यावेळी धरमपेठ झोन सभापती श्री. प्रमोद कौरती, सत्तापक्ष उपनेत्या व नगरसेविका श्रीमती वर्षा ठाकरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री. दयाशंकर तिवारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ झाला, स्वामी हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणीच ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. रामकृष्ण परमहंसानी नरेंद्र मधील एक अद्वितीय पुरुष ओळखला होता. त्यांनी नरेंद्र ला मार्गदर्शन केले. सन १८८१ साली डफ कॉलेजातून उत्तम गुणांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नरेंद्रांनी वडिलांच्या मृत्यू नंतर नोकरी करून घराच्या भार उचलण्या ऐवजी संन्यास घेतला म्हणून आप्तेष्टा मंडळी त्यांच्या मागे त्यांची निंदा करू लागले. पण नरेंद्रांनी गुरु कडून योग्य मार्ग मिळवला होता.
१५ ऑगस्ट १८८६ रोजी त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले. ३१ मे १८९३ ला स्वामी विवेकानंद अमेरिकेला निघाले हिंदू धर्माचा सर्व जगभर प्रसार करण्याचा त्यांचा उद्देश होता परन्तु त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे ४ जुलै १९०२ ला त्यांचे निधन झाले. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.
अधिक वाचा : राज्यातील सर्वसामान्य माणसांचे भले व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस